महाराष्ट्र ताज्या बातम्या

LoP Ambadas Danve: क्या हुआ तेरा वादा?; १२ जूनला जिल्हानिहाय चक्का जाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगर/मुंबई – कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, ४५ हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदानात परत आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेलं हे सरकार आता सगळं विसरलंय. सत्तेच्या खुर्चीवर बसताच या सरकारने जनतेची फसवणूक केली. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजे फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर; १४४ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान

महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत मुंबईतील लालबाग येथील राजे फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले. राजे फाउंडेशन वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याच परंपरेत, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय ब्लड सेंटरच्या […]

मुंबई ताज्या बातम्या

नवी मुंबई महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करणार – खा. नरेश म्हस्के यांची ग्वाही

By देवेंद्र भुजबळ सानपाडा, नवी मुंबई : ठाणे महापालिकेप्रमाणे नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, अधिकाऱ्यांना जाब विचारता यावा, अशा धर्तीवर नवी मुंबई महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करण्याचा निर्धार खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेतील काही साचेबंद कारभारावर टीका करत काही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Stock Exchange: कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे जारी केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी- चिंचवड ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंना खानविलकरांचे लाखमोलाचे प्रोत्साहन

दुबई येथे होणार्‍या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ३ मुंबईकर खेळाडूंचा पूर्ण खर्च उचलला मुंबई : जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. येत्या १४ ते १८ जूनदरम्यान अजमन, दुबई येथे होत असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असलेल्या ३ मुंबईकर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रेपो दर कपात, ठेवीदारांचे हित धोक्यात – काँग्रेस नेते विश्वास उटगी यांचा रिझर्व्ह बँकेवर हल्लाबोल

मुंबई : “रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात ही कर्जवाढीस चालना देण्याचा प्रयत्न असला, तरी यामुळे सामान्य ठेवीदारांचे आर्थिक नुकसान निश्चित आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते व बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ६ जून रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर ६% वरून थेट ५.५% करण्यात आला. अनेक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शनि मंदिर व्यवस्थापन वादात! मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करा, भक्त आणि भाजपची मागणी

अहमदनगर/मुंबई : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून देवस्थानात एकूण ११८ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप श्रद्धावान हिंदू भक्त जयेश नागेंद्रनाथ शहा यांनी केला असून, या विरोधात त्यांनी थेट ट्रस्टला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. जयेश शहा यांनी ३० एप्रिल रोजी ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “हे अत्यंत धक्कादायक असून, पारंपरिक […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाचा तीव्र विरोध – माकपचे केंद्र सरकारवर आरोप

नवी दिल्ली: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारत सरकारने एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी दिलेल्या परवानगीचा तीव्र शब्दांत निषेध करतो. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेपासून वंचित असून, भारतासारख्या मोठ्या देशातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा एका परदेशी कंपनीच्या हवाली केल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर मोठे संकट निर्माण होणार आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांना आपल्या देशातील दूरसंचार प्रणाली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” — भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई — काँग्रेस पक्षाला भारत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या सर्व शंका व मुद्द्यांवर सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले होते. मात्र, या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्याने आयोगाने खेद व्यक्त केला आहे. “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा त्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखोंचा जल्लोष; रायगडावर गर्दीचा विक्रम

६ जूनचा सोहळा ठरला वैचारिक क्रांतीचा प्रेरणास्थान – संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगड: ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक गर्दीत पार पडला. शिवभक्तांनी प्रचंड उत्साहाने सहभागी होत मागील सर्व विक्रम मोडीत काढले. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर पुन्हा एकदा शिवकाल अवतरल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले […]