मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या होत्या . यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूका होणार आहेत . यासाठी रणधुमाळी सुरु असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election 2024 )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मैदानात उतरले आहेत . महायुती (शिवसेना शिंदे गट ) उमेदवार किशोर दराडे (Kishore Darade )यांच्यासाठी आज ते नाशिक,शिर्डी आणि जळगावमध्ये बैठकांचा धडाका लावणार आहेत . मात्र सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे उमेदवार मागे घेण्यासाठी अजित पवारांना विनंती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला . या निवडणुकीत महायुतीला (mahayuti )अवघ्या १७ जागांवर यश मिळालं त्यात भाजपाला २३ जागांवरून अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला . भाजपचा महाराष्ट्रात झालेला हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.त्यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली असून ते पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत . या मतदारसंघात अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार मैदानात उतरले आहेत. महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीबाबतीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्याचप्रमाणे अपक्ष विवेक कोल्हे नाशिकमध्ये महायुतीला डोकेदुखी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील 36 पैकी 15 उमेदवारांनी माघार घेतली. आता 21 उमेदवार रिंगणात राहिलेत. पण खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगाचे नितीन कोल्हे यांच्यात तिरंगी होणार आहे.