नवी मुंबई
‘मलाही गोरगरीब समाजाचे दु:ख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे, दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे,’ मराठ्यांना आरक्षणाचा अध्यादेश दिल्यानंतर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे हे वाशी येथे विजयी सभेत एकत्र आले होते. या ठिकाणी विजयी सभा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली. या दोन्ही गुरुंचा माझ्यावर आशीर्वाद आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. कोणावरही अन्याय न करता आणि कोणाकडूनही आरक्षण न काढून घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षणं देणं हाच माझा प्रयत्न आहे.
आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन. या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी सगल्यात पहिले मुंबईला, आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.