Congress Lok Sabha first List Announced : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कोल्हापूरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस महाराष्ट्रात ४८ पैकी १८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणते घटक पक्ष कोणकोणत्या जागांवरुन लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय सोलापूरातून प्रणिती शिंदे, नंदुरबारातून गोवाल पाडवी, अमरावतीतून बळवंत वानखेडे, लातूरमधून शिवाजी कलगे यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र वेळोवेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपमध्ये जाणाऱ्या चर्चा खोडून काढल्या होत्या, काहीही झालं तरी मी काँग्रेससोबत राहणार असल्याचं त्या ठामपणे सांगत होत्या, आता पहिल्याच यादीत त्यांना सोलापूरातून खासदारकी मिळाल्यानंतर त्या निश्चित झाल्या असतील.