मुंबई : सोलापूर (Solapur) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे . त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे .या प्रचारावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi )हल्लाबोल चढवला आहे आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे . ‘हाथी के दात दिखाणे के एक और खाणे के एक’ यां भाजपच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेला आहे तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. त्यांच्यामुळे धर्म – जातीवरून लोकांमध्ये तेढ निर्माण झाला आहे असा टोला त्यांनी लगावला आहे . तसेच मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नसून मला ईडीची भीतीही नाही, दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे असेही त्यांनी सांगितले आहे . .
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ते रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे, तर एवढी भीती का आहे तुम्हाला? ही लोक 400 सोडा, मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर, त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं? असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर चढवला आहे . मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला, तुमचा विश्वासघात केला. मागील 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं, हा एकच प्रश्न त्यांना विचारा, त्यांची बोलती बंद होईल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
या लोकसभेसाठी मला फक्त तुम्ही आशिर्वाद द्या जोपर्येत काँग्रेस जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही.मग बाकी ते टेन्शन माझं मी बघते . मी ईडीबिडीला घाबरत नाही, मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे . निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. मात्र आता सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताय. ज्या दिवशी असं व्हायला लागेल, त्या दिवशी लोकशाहीला धोका निर्माण व्हायला लागतो, म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत. मी एकमेव आहे, जी विधानसभेत भाजप विरोधात बोलतेय असं त्यांनी सांगितलं