मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला आहे .आज ते मुंबईमधील (Mumbai)आरबीआयच्या वर्धापनदिनाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला येत आहेत, पण ते का येत आहेत ? गेल्या काही वर्षात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मुंबई विकली. गौतम अडाणी, या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकले. मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले.आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार ? आता त्यांना काय विकायचे आहे ? असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे .
नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमानात सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत, घोषणा करत आहेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटीचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का ? काँग्रेस साठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस साठी आहे .नोटीसा फक्त आम्हालाच देणार का ? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे .निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात किंवा देशात राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. आणि जर ते सरकारी विमान आणि फौज फाटा घेऊन गेले, तर निवडणूक आयोगाने त्या संदर्भातला खर्चाचे बिल त्यांना पाठवायलं हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून ते पैसे वसून करायला असंही राऊत म्हणाले .
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरूनही राऊतांनी हल्लाबोल चढवला आहे .त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो,त्यांनी मणिपूरला जावं. तिकडे महिलांवर ती अत्याचार झाले आहेत ते पाहावे. कश्मीरी पंडितांचे हालहवाल समजून घेण्यासाठी त्यांना आम्ही जम्मू-काश्मीरला पाठवायला तयार आहोत .आमच्या खर्चाने त्यांनी जाऊन यावं, उगाच बकवास करू नये आणि तोंडाची वाफ घालवू नये अशी टीका राऊत यांनी केली आहे .