मुंबई- महाभारतात एकलव्यानं गुरु द्रोणाचार्य यांच्यासाठी त्यांचा शिष्य एकल्वयानं गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला होता. सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांना गुरु द्रोणाचार्यांच्या जागी मानणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांसाठी दोन अंगठे कापून देण्याची तयारी दर्शवली आहे. सदाभाऊ खोत हे रयत क्रातीं संघटनेचे प्रमुख असून महायुतीसोबत आहेत.
फडणवीस यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ?
महायुतीतील कुटुंबप्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास असल्याचं इस्लामपूरच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत सांगत होते. यावेळी त्यांनी महाभारताचा दाखला दिला. महाभारतात एकलव्यानं गुरु द्रोणाचार्य यांनी गुरुदक्षिणा म्हणून एक अंगठा दिला होता. मात्र फडणवीस यांच्यासाठी आपल्याला दोन अंगठे देण्याची वेळ आली तर मागे-पुढे पाहणार नाही, असं सदाभाऊ खोत या भाषणात म्हणालेत.
हातकणंगलेतून उमेदवारीसाठी होते इच्छुक
सदाभाऊ हातकणंगलेतून महायुतीकडून हातकणंगलेतून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळाली नाही. धैर्यशील माने यांना पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीयय सदाभाऊ यांचे जुने राजकीय गुरु राजू शेट्टी हे हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मैदानात आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिलीय. अशात उमेदवारी न मिळाल्यानं सदाभाऊ नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावर सदाभाऊ यांनी स्पष्टीकरण देत एकलव्याशी स्वताची तुलना केली आहे.
हेही वाचाः‘…फडणवीस घोषणा करतात, तर शिंदे काय करतात?’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका