मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)आणि महायुतीमधील( MahaYuti) प्रमुख नेत्याकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . ‘राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? सगळे राम मंदिराबाबत बोलतात, पण सीतेच्या मूर्तीबद्दल कोणीच बोलत नाही,’ अशी तक्रार मला काही महिलांनी केल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात, त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे .
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत. पण राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात असा टोला त्यांनी लगावला आहे . .दरम्यान भाजपने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही ढब्बू पैशाच्या मुद्द्यावरून टीका केली. ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं आहे. शिवकालीन ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार? उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राजाची चाकरी सुरू केली, अशी टीका भाजपने केली आहे.ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं नाणं आहे. शिवप्रेमींच्या ह्रदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही. याचा विसर संजय राऊत यांना पडला आहे. उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आहे. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना राऊतांनी थोडा विचार करावा, उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे वागणं बरं नव्हं, असं भाजपने म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आता अयोध्येतील राम मंदिर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. या मंदिरावरून कित्येक पक्षांनी अनेक निवडणुकांमध्ये राजकारण केल्याचं देशातील जनतेनं पाहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी या मंदिराचं उद्घाटन केल्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. अयोध्येतील राम मंदिराचा भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात आहे.आता यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे .