मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबाने (Rahul Gandhi ,Sonia Gandhi Vote) कॉंग्रेस सोडून ‘आप’ला मतदान केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत गांधी परिवाराने काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे मित्रपक्ष दिल्लीत एकत्र निवडणूक लढवत आहेत. आप आणि काँग्रेसने भाजपविरोधात संयुक्त उमेदवार उभे केले आहेत, अशी दिल्लीतील ही पहिलीच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आहे.सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दिल्लीचे मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेसने या जागेवर (Delhi Lok Sabha) आपला उमेदवार उभा केला होता. मात्र यंदा चित्र वेगळं आहे . दिल्लीत जागावाटप पद्धतीनुसार आप चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. त्याअंतर्गत नवी दिल्लीतील जागा आपकडे आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार (AAP Candiadate Somnath Bharti) उभा केलेला नाही. त्यामुळे गांधी परिवार आज आप पक्षाचे उमेदवार सोमनाथ भारती यांना मतदान केलं आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.तुमचं मत तुमचं जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल. लोकशाहीच्या या महान उत्सवात आई आणि मी (Rahul Gandhi Sonia Gandhi Vote) मतदान करून हातभार लावला आहे. तुम्ही सर्वांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडा, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केलं आहे .