मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीत (MahaYuti) जागावाटप रखडलेलं आहे . या जागेवरून शिंदे गट आणि भाजपत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे .शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कट होणार आहे. यावरून आता ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी शिंदे गटाला ( shinde group ) डिवचलं आहे. शिवसेनेतून फुटलेल्या १३ खासदारांमधील चार ते पाच जण पुन्हा ठाकरे गटात येण्यासाठी रडत आहेत. पण, गद्दारांना पक्षात पुन्हा स्थान नाही,, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटल्याचं खैरेंनी ठणकावून सांगितलं आहे . .
यामध्ये हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या जागी शिवसेना नांदेड जिल्ह्याप्रमुख बाबूराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली . तसेच, यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप पाहता त्यांनाही उमेदवारी न देता राजश्री पाटील यांना उमेदवारीची दिली आहे . दरम्यान आता नाशिकचे हेमंत गोडसे आणि खासदार धैर्यशील माने यांचं काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या नावाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांना हातकणंगलेमधून संधी देण्याची चर्चा सुरू आहे, तर हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या खासदारांना संधी मिळणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना यावर खैरे म्हणाले, . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचेही डोळे भरून आलेले दिसत आहेत. त्यामुळे कुणीही गद्दारी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही गद्दारांना माफ करण्यात आलं नव्हतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गद्दारांना माफ केलं नाही.” त्यामुळे आमच्या पक्षात येऊ पाहणाऱ्यांना आता जागा नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले .