मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे . त्यांनी महाविकास आघाडीबद्दल भाष्य केलं आहे . या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi )बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. या विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला( mahayuti ) फटका बसेल असे वक्तव्य अडसूळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
अमरावतील लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात एकीकडे महायुतीमधील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते . मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते . आता शिंदे गटाला अडचणीत आणणारे वक्तव्य त्यांनी केलं आहे .या लोकसभा निवडणुकीतील एकूण राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली. एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत. विरोधकांच्या एकजूटीचा महायुतीला नक्कीच फटका बसणार आहे . असे ते म्हणाले आहेत .दरम्यान अडसूळांनी महायुतीविरोधात वक्तव्य केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. महायुतीत राहून आपल्या विरोधात बोलणे असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे
या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात एकीकडे महायुतीमधील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता. नवनीत राणाविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते. मात्र. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या त्या बैठकीनंतर अडसूळ यांनी माघार घेतली. त्या बैठकीत अमित शाह यांनी अडसूळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा अडसूळ यांनी केला आहे.आता महाविकास आघाडीबाबत केलेल्या वक्तव्याने आरोप प्रत्यारोपाचे खटके उडत आहेत .