मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Kaur Rana)यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court)वतीने निकाल दिला जाणार आहे . याकडे अमरावतीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला होता. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहिल्यादांच नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत .त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यातच मीच निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून केला जात आहे. या संदर्भात आज त्यांनी सकाळीच अमरावती शहरातील मंदिरांना भेट देत दर्शन घेतले. जात वैधता प्रमाणपत्राचा निर्णय हा माझ्या बाजूने लागणार असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. दरम्यान अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वीच आज सकाळी ११ वाजता न्यायालय निकाल देणार आहे. याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, १२ ते १३ वर्षापासून मी संघर्ष करत आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मला निकाल कळेल. महिलांच्या मागे नेहमी संघर्ष असतो ते त्यांनी सांगितले . आज त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे ,..
याआधी २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या बरोबरच उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालय आज जाहीर करणार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचे भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. त्या आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यापूर्वीच न्यायालयाचा निर्णय घेणार असल्याने याची उत्सुकता वाढली आहे.