ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा; अर्थमंत्र्यांचे पती अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर यांचं मोठं विधान; सरकारवर थेट टीकास्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोखे प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

रिपोर्टर टीव्ही या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, निवडणूक रोखे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपचा संघर्ष विरोधी पक्षांशी होणार नसून निवडणूक रोखे मुद्द्यावरुन होणारी लढाई भाजप आणि भारतीयांमध्ये होताना दिसेल.

मतदार मोदी सरकारला कडक शिक्षा देणार…
अर्थमंत्री पुढे म्हणाले, मला असं वाटतं निवडणूक रोखे संबंधित मुद्द्याला आजच्यापेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होईल. हा विषय झपाट्याने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. हा केवळ भारताचाच नाही तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, हे आता सर्वांनाच हळूहळू समजू लागलं आहे. अशा स्थितीत या सरकारला मतदारांकडून कठोर शिक्षा होईल, असे ही ते यावेळी म्हणाले.

निवडणूक रोखेंमुळे कोणाला फायदा?
गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वटवलेल्या १२,७६९ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांपैकी, जवळपास निम्मे रोखे सत्ताधारी भाजपला मिळाले असून त्यापैकी एकतृतीयांश २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरले गेले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये भाजपकडे सर्वाधिक निवडणूक रोखे (एकूण ६,०६०.५२ कोटी रुपये) आहेत.

कोण आहेत परकला प्रभाकर?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते २०१४ ते २०१८ या कालावधीत आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाच्या पदावर होते. याशिवाय तामिळनाडू सरकारच्या सरकारच्या दळणवळण सल्लागार म्हणून म्हणून काम केलं आहे.

१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत पक्षांनी वठवलेले निवडणूक रोखे खालील प्रमाणे –

भाजप – ६,०६०.५ कोटी (47.5%)
तृणमूल काँग्रेस – १,६०९.५ कोटी
काँग्रेस – १,४२१.९ कोटी
भारत राष्ट्र समिती – १,२१४.७ कोटी
बिजू जनता दल – ७७५.५ कोटी
डीएमके – ६३९.० कोटी
वायएसआर – ३३७.० कोटी
तेलुगू देसम पार्टी – २१८.९ कोटी
शिवसेना – १५८.४ कोटी
राष्ट्रीय जनता दल – ७२.५ कोटी
आम आदमी पार्टी – ६५.५ कोटी
इतर पक्ष – १९५.८ कोटी

एकूण = १२,७६९.१ कोटी

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे