बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या संपत्तीत १० कोटींनी वाढ झाल्याचं समोर आलंय. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election) उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे समोर आलं आहे.
संपत्तीत किती वाढ
पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्या संपत्तीत पाच वर्षांत १० कोटींनी वाढ झालीय. त्याचवेळी या दोघांवरील कर्जातही ९ कोटी ९४ लाख रुपयांनी वाढल्याचं समोर आलंय.
पंकजा आणि चारुदत्त पालवे यांची एकत्र संपत्ती ही ४६ कोटी ११ लाख रुपये इतकी नोंदवण्यात आलेली आहे. दिलेल्या शपथपत्रानुसार पंकजा यांच्याकडे ६ कोटी १७ लाखांची जंगम मालमत्ता आहे. यात बँकेतील एफडी, शेअर्स, सोनं यांचा समावेश आहे.
पंकजा यांच्याकडे ३२ लाख ५८ हजारांचं ४५ तोळं सोनं आहे. तर ३ लाख २८ हजारांची चांदी आहे.
त्यांचे पती चारुदत्त यांच्याकडे १३ लाखांचं २० तोळं सोनं आहे. तर १ लाख ३८ हजारांची दोन किलो चांदी आहे.
पंकजांचे पती चारुदत्त यांनी आपल्या दोन्ही मेव्हण्या प्रीतम आणि यशश्रीकडून कर्ज घेतलेलं ाहे. हे कर्ज १ कोटींच्या घरात
आहे.
हेही वाचाःज्यांना घरातील मंगळसुत्राचा सन्मान ठेवता आला नाही..’, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची काय टीका?