X: @therajkaran
काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, 5 जागांवर शिवसेना (उध्दव ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप होत नाही. एकही जण जागा सोडायला तयार नाहीत, संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतात की, वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे जागाच मागितल्या नाहीत.
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रातून घालवणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे की, आपला पक्ष वाढवणे याला प्राधान्य आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, असेही आंबेडकर म्हटले आहे.
मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. नवनीत राणा मोठी फसवी व्यक्ती आहे. राणांचे जात प्रमाणपत्र बोगस असून, काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.