ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70

महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे.

प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना राजकारण शी बोलताना दरेकर म्हणाले, धैर्यशील पाटील हे दक्षिण रायगडचे भाजपा अध्यक्ष असून ते राज्यसभेचे खासदार (Rajya Sabha member) झाल्यामुळे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) संघटन मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्याचबरोबर पक्षाचे आमदार वाढवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत (Assembly elections 2024) पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी धैर्यशील पाटील यांच्या खासदारकीच्या निश्चित उपयोग होणार आहे.

दरेकर म्हणाले, धैर्यशील पाटील अभ्यासू असून ते कोकण व महाराष्ट्राचे प्रश्न (Issues of Konkan and Maharashtra) राज्यसभेत ते ताकदीने मांडतील. विशेषत: रायगडला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न खासदारकीच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात