मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha ) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अखेर डाव टाकला आहे . या मतदारसंघातील भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आता बंडाच निशाण हाती घेतलं असल्यामुळे महायुतीचा (MahaYuti )खेळ बिघडणार आहे . कारण मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षात येत्या 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे . यामुळे या मतदारसंघातील भाजप नेते आणि माढ्यातील राजकीय वर्तुळातील मोठं नाव असलेले मोहिते पाटील नाराज झाले. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटलांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांना डावलून निबाळकरांना उमेदवारी देण्यात आली .आता शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे . . येत्या 13 एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित आहे . रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांची बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, लोकसभेत मोहिते पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत .
दरम्यान, मोहिते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मोठं कुटुंब आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचा मोठा प्रभाव आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात मोहिते पाटलांचा गट सक्रिय आहे. मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशनाने माढा लोकसभेसह सोलापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपला फटका बसणार आहे .माढ्यातून मोहिते पाटलांनी निवडणूक लढली तर लोकसभेच्या तोंडावर भाजपला चांगलाच धक्का बसणार आहे