मुंबई : शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन (Shiv Sena Foundation Day)आज साजरा करण्याची दुसरी वेळ आहे . महाराष्ट्रात आज म्हणजेच 19 जून रोजी शिवसेनेच्या दोन्ही पक्षाकडून 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा (UBT) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत .
ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि त्यात शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले नऊ खासदार. यामुळे नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा औचित्य साधून उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे , याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . याच वर्धापन दिनाच्या दिवशी नुकत्याच लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे हा वर्धापन दिन आपल्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साह करण्यासाठी आणि एक प्रकारे ऊर्जा भरण्यासाठी ठाकरेंसाठी महत्त्वाचा असणार आहे .
दरम्यान दुसरीकडे शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाणार असून सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे दरम्यान वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाश शिंदे ही शक्तीप्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदार संघ असलेल्या वरळीत वर्धापन दिन साजरा करत आहेत ..