ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’, ‘गणगोत’वरुन ओबीसी संघटनेचं उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जारी केलेल्या मसुद्यावरून ओबीसी संघटनांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ओबीसी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे अॅड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी संघटनेकडून यापूर्वीही करण्यात आली होती. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भाजपची साथ सोडा आणि आमच्यासोबत या’; प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना खुली ऑफर

वाशिम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या वाशिम दौऱ्यावर आहेत. येथे एका पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं, अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंना दिली आहे. उद्धव ठाकरेही आमच्याच सोबत आहेत. आता एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यायचं की नाही हे ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

विनोद तावडे की पंकजा मुंडे? महाराष्ट्रातून भाजपकडून राज्यसभेत कोणाची वर्णी लागणार?

मुंबई राज्यसभा निवडणुकीचा तारीख जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १५ राज्यातून निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून ६ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे कुमार केतकर, ठाकरे गटाचे अनिल देसाई, राष्ट्रवादी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशवंत शेतीमालाचा भाव संरक्षणासाठी अर्थसंकल्पात ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत आर्थिक तरतूद करा, किसान सभेची मागणी

मुंबई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा २०२४-२५चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशभर कृषी संकट वाढत असून शेतकरी अधिकाधिक संकटात सापडले जात आहेत. नव्या अर्थसंकल्पामध्ये ही बाब लक्षात घेऊन शेतीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात कांदा, टोमॅटो, दूध, बटाटा, फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी वारंवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पण मराठा आरक्षण कुठे आहे?’ निलेश राणेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

मुंबई मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षणाची दार उघडून दिली. या अधिसूचनेवर ओबीसी समाजातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी मराठा आरक्षण कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आंदोलन अजून संपलेलं नाही, ‘या’ समाजासाठीही लढा उभारणार, रायगडावरुन जरांगे पाटलांची मोठी घोषणा

रायगड मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या लढ्याला यश आल्यानंतर आज ते रायगड दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मसुदा जारी केला. यानंतर मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी काम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?

मुंबई राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत जाणार – धनंजय मुंडे

मुंबई शेतकऱ्यांनी शेती विषयक विचार बदलले पाहिजेत, शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफाॅर्मेशन (MITRA ), कृषी विभाग,मा.बाळासाहेब ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाविकास आघाडीचा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट’; शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची जहरी टीका

मुंबई संजय राऊतांसह ठाकरे गटाचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते घटनेविरोधात, बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसल्याचा आरोप राऊतांकडून केला जात आहे. दरम्यान यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचा सोंगाड्या आहे, अशा शब्दात ज्योती वाघमारे यांनी टीकास्त्र सोडले. वाघमारे पुढे म्हणाल्या, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांच्या पुस्तकाने खळबळ

नवी दिल्ली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर विविध आरोप केले जात असतानाच त्यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या पुस्तकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज दिल्लीत रणजीत सावरकरांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकान नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा करण्यात आला आहे. या […]