ताज्या बातम्या महाराष्ट्र

चंद्रकांत रघुवंशींची घरवापसी? येत्या 2 दिवसात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील जागा मविआकडून काँग्रेसला सोडण्यात आली आहे. मात्र अद्याप काँग्रेसला येथून चांगला उमेदवार मिळू शकलेला नाही. प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने एका नेत्याची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यांची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रघुवंशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आघाडीत पायपुसणे व्हावे’, नाना पटोले यांच्यावर आशिष शेलार यांची कवितेतून टोलेबाजी

मुंबई– भिवंडी आणि सांगली मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि मविआतील इतर दोन घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. सांगलीची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलीय. या मतादरसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही, ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवारांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जाहीर केलीय. यामुळं काँग्रेसमधील वरिष्ठ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘…फडणवीस घोषणा करतात, तर शिंदे काय करतात?’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका

मुंबई – कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फडणवीस जाहीर करतात, जाहीर झालेले उमेदवारही तेच बदलायला लावतात, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात, अशी झोंबणारी टीका शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलवर चालतेय ; सचिन सावंतांची टीका

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha)मतदारसंघातील उमदेवार जाहीर करण्यात आला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची घोषणा केली . आता या उमेदवारीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत( Sachin Sawant) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे . त्यांनी म्हटले की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम लढो हम कपडा सांभालते है”ठाकरेंची भूमिका ; उमेदवारी मिळताच श्रीकांत शिंदेचा वार

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . उमेदवारी जाहीर होताच त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मतदारसंघात झालेला विकास पाहून ठाकरेंची लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याला पुढे करून “तुम लढो हम कपडा सांभालते है” […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना धक्का; एकनाथ खडसेची भाजपमध्ये घरवापसी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse) भारतीय जनता पक्षामध्ये (Bharatiya Janata Party )घरवापसी करणार असल्याची माहीती समोर आली आहे .आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

31% मराठा समाज भूमिहीन, 43 % मराठा महिला मजूर, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

मुंबई– मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जानेवारी आणि फएब्रुवारी महिन्याच्या काळात राज्यभरात पाहणी करण्यात आली. त्यात मराठा समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला गेल्याचा आणि सरकारी नोकऱ्यांत मराठआ समाजाची टक्केवारी घटल्याचं समोर आलेलं आहे. अहवालातील धक्कादायक वास्तव मराठा समाजातील ३१.१७ टक्के समाज हा […]

मुंबई

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात प्रताप सरनाईकच रिंगणात ; जितेंद्र आव्हाडांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही . त्यात ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो . पण ठाण्यात भाजपने दावा केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे . दरम्यान अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंचाच दरारा ; शिंदेच्या शिवसेनेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे . एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde)शिवसेनेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसोबत गेलेल्या त्याच आमदारांचा पत्ता […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कुणाला देणार उमेदवारी, आज निर्णयाची शक्यता

मुंबई- बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आता सातारा आणि माढ्याबाबत शरद पवार काय निर्णय घएणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज किंवा उद्या निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपा आणि उदयनराजेंना आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात शरद पवार असल्याचं सांगण्यात […]