ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे करणार पवारांचा प्रचार; सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावरुन चर्चेला उधाण

बारामती : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो दिसल्याने अनेक पश्न उपस्थित केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपा खासदार रामदास तडस यांच्याकडून छळ, सून पूजा तडस यांचा खळबळजनक आरोप, खडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नागपूर – वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस याही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या पूजा तडस यांनी आज सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेतली. घरात पूजा तडस आणि त्यांच्या बाळाचा छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय द्यावा अशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमधील बंडोबा 24 तासांत झाले थंडोबा, सांगली आणि मुंबईतील नाराज नेत्यांचे सूर नरमले

मुंबई- मविआच्या जागावाटपावर नाराज झालेल्या सांगली आणि मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीची आणि बंडाची भाषा सुरु केली होती. मात्र दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांनी या नेत्यांचे कान पिळल्यानंतर नेत्यांच्या तोंडची बंडाची भाषा बदलल्याचं दिसतंय. सांगलीत काय घडलं सांगलीत चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतर, तिकिटासाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]

जिल्हे महाराष्ट्र मुंबई

नाशिकचा महायुतीचा तिढा कायम, भुजबळांना भाजपाच्या कमळावर लढवण्याचा आग्रह कशासाठी?

मुंबई- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंगातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन बराच काळ लोटला तरी नाशिक लोकसभा महायुतीतून कोण लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या मतदारसंघावर दावा करतायेत. साताऱ्याची जागा उदयनराजेंना सोडण्याची तयारी अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का ; कीर्तिकुमार शिंदेचा मनसेला रामराम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला( mahayuti )बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने मनसेच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडली आहे . मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचा हात धरताच राज ठाकरेंना पक्षातून मोठा धक्का बसला आहे . मनसेने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंना अमित शाहांनी कोणती फाईल दाखवली? संजय राऊत यांची कडवट टीका, नमोनिर्माण पक्ष म्हणून टीकास्त्र

मुंबई- राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्या भेटीत अशी कोणती फाईल राज यांना दाखवण्यात आली की त्यामुळं मुंबईत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे गेले, तसंच काही या प्रकरणात नाही ना, असा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पवार विरुद्ध पवार, गेल्या वेळी मुलीला मत दिलंत, आाता सुनेला द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन, भावकीला दिला दम

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झालेला आहे. बारामतीत प्रचार करणाऱ्या अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. मुलीला संधी दिलीत आता सुनेला द्या १९९१ साली बारामतीतून आपण खासदार झालो, त्यानंतर शरद पवार यांना बारामतीकरांनी निवडून दिलं. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्या. आता पवारांच्या सुनेला निवडून […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याची लढत ठरली, उदयनराजे भोसलेंना शशिकांत शिंदे देणार आव्हान, तर रावेरमधून शरद पवारांकडून श्रीरामाला संधी

मुंबई- सातारा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता अनेकांना होती. सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं, महायुतीच्या उदयनराजेंसमोर कुणाला उमेदवारी द्यायची याचा पेच होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव या मतदारसंघासाठी चर्चेत होतं. अखेरीस शरद पवारांकडून या जागी शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आलीय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

बाजारात तुरी… खडसेंच्या घरवापसीपूर्वीच दमानियांचा राज्पपालपदाला विरोध, थेट राष्ट्रपतींना लिहलं पत्र

मुंबई- उ. महाराष्ट्रातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करणार हे स्पष्ट झालेलं आहे. खडसे यांनीच दिल्लीत जे पी नड्डा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असंही खडसेंनी सांगंितलंय. मात्र राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांच्याशी […]