जळगाव- जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या स्मिता वाघ यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून करण पवार यांनी आव्हान दिलं आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत, करण पवार यांना उमेदवारी दिलीय. आता उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा वाद मतदारसंघात प्रचारादरम्यान दिसतोय.
गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांचे नीकटवर्तीय असलेल्या गिरीश महाजनांचा जळगावच्या राजकारणावर चांगलाच प्रभाव आहे. एकनाथ खडसे यांच्या रोषालाही हाच प्रभाव कारणीभूत ठरला होता. आता उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर गिरीश महाजनांनी टीका केली होती. त्या टीकेला आता उन्मेष पाटील यांनी उत्तर दिलंय.
संकटमोचक असतील देव नव्हेत- उन्मेष पाटील
गिरीश महाजन हे संकटमोचक असतील मात्र ते देव नाहीत. त्यामुळं त्यांनी पाप-पुण्याचं सांगू नये, असा टोला उन्मेष पाटील यांनी लगावलेला आहे. भाजपा अबकी बार ४०० पार म्हणतेय तर आम्ही अबकी बार करण पवार असं म्हणतोय, असंही पाटील यांनी सांगितलंय. भाजपा केवळ डोकी मोजतेय आम्ही डोक्यांसोबत माणसांच्या मनांचाही विचार करत आहोत, असं पाटील म्हणालेत.
महाजनांना मतं मागण्याचा अधिकार नाही-उन्मेष पाटील
दूध उत्पादक शेतकरी, लिंबू उत्पादक शेतकरी या सरकारनं वाऱअयावर सोडला आहे. कापूस उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांबाबत या सरकारची गेंड्याची कातडी आहे, अशी टीका उन्मेष पाटील यांनी केलीय. गिरीश महाजन यांना मतं मागण्याचा अधइकार नाही, अशी टीकाही त्यांनी केलीय.