ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही, मराठ्यांचं वादळ मुंबईऐवजी नवी मुंबईतच थांबणार?

मुंबई मराठ्यांचं आंदोलन मुंबईत धडकणार की नवी मुंबईतच थांबणार असा सवाल उपस्थित झाला आहे. मुंबईतील आझाद मैदान इतक्या मोठ्या जमावासाठी पुरेसा नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जरांगे पाटील काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मराठ्यांच्या आंदोलनाबरोबर ओबीसी समाजानेही चलो मुंबईची हाक दिली आहे. आझाद मैदानात ५ हजारांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा महामोर्चा मुंबईच्या मार्गावर, 26 जानेवारीला ओबीसीही गाढवं, डुकरं घेऊन होणार दाखल

मुंबई पुण्यात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा आंदोलक उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. याशिवाय ओबीसी महासंघानेही जरांगे पाठोपाठ मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगेंना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश, मराठा आंदोलनाला धक्का?

मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात मनोज जरांगेंना न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील पुण्यातून प्रवास करीत असून उद्यापर्यंत ते मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. यावेळी मुंबईतूनही मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते मोर्चाच सहभागी होण्याची शक्यता आहे. आज गुणरत्न सदावर्ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पहाटे 4 ते 5.30 वाटाघाटी, मात्र जरांगे पाटील भूमिकेवर ठाम; आजचा मुक्काम लोणावळा

पुणे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची तोफ पुण्यात दाखल झाली आहे. दरम्यान आज पहाटे जरांगेंकडे आरक्षणाचा प्रस्ताव घेऊन सरकारचे प्रतिनिधी आले होते, त्यांच्याकडून तपशील देण्यात आला आणि मुंबईचा दौरा टाळण्याचा आग्रहही करण्यात आला होता. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिष्टाईसाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना रिकाम्या हाताने परतावे लागले. मराठा आरक्षण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलनाचा एल्गार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईच्या दिशेने कूच

अंतरवाली सराटी मराठा समाजाच्या तरुणांसाठी सर्व मराठा बांधवांनी मुंबई एकत्र येण्याचं भावनिक आवाहन आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून केलं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझं काहीही झालं तरी चालेल पण मराठा समाजासाठी आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नसल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. २६ तारखेला गल्लोगल्लीत पाय ठेवायला जागा दिसणार नाही, इतक्या मोठ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाच्या जाहिरातीवर ओबीसींचा आक्षेप, राज्यभरातून निवेदने

मुंबई राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम सुरू आहे. आयोगाने यासंदर्भात एक जाहिरात केली असून यानुसार मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवाव्यात. या जाहिरातीवर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला असून राज्यभरातून निवेदन दिले जात आहेत. राज्य सरकार नियुक्त न्या. संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित समिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील मराठ्यांच्या आंदोलनाला लागणार ब्रेक? मनोज जरांगेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका

मुंबई मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २० जानेवारी रोजी मुंबई दाखल होणार आहेत. मुंबईत येऊन ते उपोषण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार आहेत. दरम्यान त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील मराठ्यांचं आंदोलन यशस्वी होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण सल्लागार अध्यक्षांना महिन्याला साडे 4 लाख मानधन अन् सुविधांचा वर्षाव

मुंबई राज्य सरकारसाठी सध्या मराठा आरक्षणाचा पर्याय शोधून काढणं अत्यंत गरजेचं ठरलं आहे. यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांवर सुविधांचा वर्षाव करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षांमा महिना साडेचार लाख मानधन आणि सदस्यांना चार लाख मानधन, विमान प्रवास भाडे, वाहन, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू

पुणे मराठा समाज मागास आहे का, याची चाचपणी करण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली असून आज पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू आहे. सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत सर्वेक्षण चाचणी बाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बैठकीत निकषांवर चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत या निकषांवर निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील सर्वेक्षण प्राधान्याने व वेळेत पूर्ण करा : राधाकृष्ण विखे पाटील

X : @therajkaran मुंबई मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. मंत्रालयात महसूल विभागाची महत्वाची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय […]