महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज ठाकरे महायुतीसोबत गुढी उभारणार? राज ठाकरे किती वाजता भाषणाला उभे राहणार? शिवाजी पार्कच्या सभेकडे राज्याचं लक्ष

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अमित शाहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतल्यानंतर, राज ठाकरे आज महायुतीसोबत जाणार का, याचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळं राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. शिवाजी पार्कच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. 70 हजार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मला आपल्याशी बोलायचं आहे……”

X: @therajkaran राज ठाकरे यांची मनसैनिकांना भावनिक साद मुंबई: शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवंनिर्माण सेनेच्या ९ एप्रिल रोजीच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने थेट एक्स या समाज माध्यमावर राज ठाकरे यांनी “मला आपल्याशी बोलायचे आहे” अशी काहीशी भावनिक साद मनसैनिकांना घातल्याने या दिवशी राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम मनसैनिकांसह येथील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मनसे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेच घोडं नक्की कुठं अडलं?

X: @ajaaysaroj राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीला आता जवळपास दोन आठवडे होत आले. बहुचर्चित आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेली ही अमित शाह – राज ठाकरे भेट महायुतीतील मनसेच्या संभाव्य प्रवेशाची अंतिम चाचपणी होती असे म्हटले तर वावगं ठरू नये. पण पंधरा दिवस होत आले तरी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाचे घोडं नक्की कुठं अडलं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागावाटपावरून महायुतीत शिमगा तर आघाडीत धुळवड

X: @ajaaysar मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे. भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू अखेर दिल्लीच्या कोर्टात

X: @ajaaysaroj मुंबई: शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यातच राज ठाकरे यांचे इंजिन देखील या डब्यांना लागणार असून मनसेने ३ जागा मागितल्या आहेत अशी चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जागावाटपाचा चेंडू आता थेट दिल्लीच्या कोर्टातच नेण्याचा निर्णय युतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेला उमेदवारी दिल्यास भाजपला देशभर विरोध

उत्तरभारतीय विकाससेनेचा इशारा X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे यांची मनसे, भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुतीमध्ये येण्याची केवळ औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. मात्र त्याआधीच उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी, मनसेला भाजपने युतीमध्ये घेतल्यास मुंबईतील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार , […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS with Mahayuti : मनसेच्या महायुतीमधील एंट्रीला मुहूर्त सापडेना

X: @ajaaysaroj राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हाय प्रोफाइल दिल्ली बैठकीला आता जवळपास ७२ तास उलटून गेले आहेत. महायुतीमधील (Mahayuti) डब्यांना आता मनसेचे इंजिन लागणार अशी चर्चा देशभर सुरू आहे. याच बैठकीचा पुढचा अध्याय म्हणून आज मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti candidates : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्प्याचे मतदान 17 एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाही शिल्लक राहिलेला नाही. परंतु, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता महायुतीतील (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीतून सोडवला जाणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

“एकच जागा देणं शक्य” : दोन जागा मागणाऱ्या राज यांचा प्रस्ताव शाह यांनी फेटाळला

X: @therajkaran महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांची भेट घेतल्यानंतर दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा हा प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे. मनसेला एकच जागा देता येईलं असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेवर […]