ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाकडून 17 तर वंचितकडून 8 उमेदवारांची घोषणा; मविआ कसा ठरवणार जागावाटपाचा फॉर्म्युला?

मुंबई : महायुतीविरोधात कंबर कसलेल्या महाविकास आघाडीची पकड हळूहळू सैल होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे महाविकास आघाडीसोबत ६ जागांवर चर्चा सुरू असताना त्यांनी थेट ८ उमेदवारांची घोषणा करीत एकला चलो नाराच दिला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत जाणार का? जरांगे पाटलांची प्रकाश आंबेडकरांनी का घेतली मध्यरात्री भेट? आजचा दिवस निर्णायक

मुंबई- मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचं दिसत असतानाच वंचित मविआसोबत जाणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआतील तिढा सुटला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च म्हणजेच मंगळवारी मविआनं प्रकाश आंबेडकरांना चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सात जागांवर वंचित अडून बसल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मविआचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही ;एकला चलोची भूमिका घेणाऱ्या शेट्टींचा सूर बदलला

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वबळावर लढण्याचा सूर आता बदलला आहे .महाविकास आघाडीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangale loksabha )उमदेवार न उभा करता मला पाठींबा जाहीर करावा असे ते म्हणाले . तसेच मी पाठींबा घ्यायला […]

महाराष्ट्र

माढ्यात शरद पवार जानकरांविरुद्ध कोणता मोहरा उमटवणार : चर्चांना उधाण

मुंबई : महायुतीमधील वादामुळे सध्या माढा लोकसभा(Madha LokSabha) मतदारसंघ भलताच चर्चेत आला आहे.महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी असेलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे महायुतीत सामील झाले आहेत . त्यामुळं आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार (Sharad Pawar)आता येथे कोणता डाव टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महाविकास आघाडीचं 44 जागांचं जागावाटप पूर्ण, या चार जागांवर तिढा कायम

मुंबई- महाविकास आघाडीचं 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. यात आता वंचितचा समावेश मविआत नसेल हे स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित चार जागांचा निर्णय लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. या चार जागांत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या चार जागांवर तिढा सुटला नाही तर या चारही मतदारसंघात बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raver Lok Sabha : एकनाथ खडसेंच्या निवडणुकीतील माघारीने रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात

X: @therajkaran गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत रावेर (Raver) मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची उमदेवारी जाहीर करण्यात आली. सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत पार पडणार, अशी जोरदार चर्चा असताना आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचं जाहीर केली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sharad Pawar : मी यापुढे निवडणुकीत कधीच उतरणार नाही : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

X: @therajkaran गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता. याबाबत स्वतः शरद पवार यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार (Madha Lok Sabha Constituency) नाही. तसेच मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA meeting: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA Meeting : शरद पवारांकडे गुरुवारी मविआची बैठक, प्रचार रणनीती आखणार : संजय राऊत

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, मविआतील जागा वाटप झाले असून ते लवकरच जाहीर करण्यात येईल, असे वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सांगण्यात येत आहे. उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]