ताज्या बातम्या महाराष्ट्र

NCP split : शरद पवारांचा फोटो, नाव वापरू नका : सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले! 

X: @therajkaran शिवसेनेप्रमाणेच (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटांमध्येही पक्षनाव व पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई चालू आहे. यासंदर्भात शरद पवार गटानं (Sharad Pawar Group ) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने अजित पवार (Ajit Pawar) यांना खडसावले आहे. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत न्यायालयाने […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

अहिल्या नगरची लढत ठरली, सुजय विखे पाटील यांच्यासमोर मविआकडून निलेश लंकेंचं आव्हान, आज होणार पक्षप्रवेश?

मुंबई- नगरसाठी बुधवार महत्त्वाचा ठरला. दोन महत्त्वाचे निर्णय एकाच दिवशी झाले. अहमदनगर हे शहराचं नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर यानंतर थोड्याच वेळात अहिल्यानगर खासदारकीच्या भाजपाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या उमेदवारीसाठी राम शिंदे, राम सातपुते अशी भाजपातील इतरही काही नेत्यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Pune Lok Sabha: पुण्यात आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही

वसंत मोरेंच्या मनधरणीमुळे मविआचे पितळ उघड X: @therajkaran मुंबई: पुण्यातील बहुचर्चित नेते वसंत मोरे यांनी गेले अनेक महिने अपेक्षित असलेला राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाच. मोरेच्या राजीनाम्याची डोळ्यात तेल घालून वाटच बघत असलेल्या काँग्रेस , शिउबाठा आणि शरद पवार गट या तिघांनीही त्यांना आमच्याच पक्षातून पुणे लोकसभा लढावी, असे आमंत्रण दिले आहे. मविआकडे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस-शिवसेनेत जागांवरुन मतभेद – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

X: @therajkaran काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  आंबेडकर म्हणाले, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंची घरवापसी टळली : शरद पवारांनी सर्व चर्चा फेटाळल्या

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. तसं झालं असतं तर घरवापसी झालेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते. आज होणारा हा संभाव्य प्रवेश मात्र टळला आहे. यावरून शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagar Politics: अजित पवारांना शरद पवारांचा मोठा धक्का?, नगरमधील खंदा समर्थक आमदार ‘तुतारी’सोबत?, आणखी किती आमदार परतणार?

पुणे – अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारनेरचे तरुण आणि लोकप्रिय आमदार नीलेश लंके यांनी हातातलं घड्याळ सोडत, तुतारी हाती घेतली आहे. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही प्रवेश करतील असं सांगण्यात येतंय. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लंके यांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नीलेश लंके शरद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raj Thackeray : शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच : राज ठाकरेंचा दावा

X: @therajkaran मुंबई: मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray news) यांनी नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे असे मी मानतो. राष्ट्रवादीत फूट जरी पडली असली तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजितदादांना धक्का : पक्षातील पदाधिकाऱ्यांसह 137 जणांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील १३७ पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात प्रवेश केला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात (Lonavala) हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे पवार गटाची ताकद वाढणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

राष्ट्रीय

राष्ट्रवादीचा अजितदादा गट विधानसभा निवडणूक अरुणाचल प्रदेशातुन लढण्यास सज्ज

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी करून भाजपशी (BJP) हात मिळवणी केलेल्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आता अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh )आगामी लोकसभेबरोबरच विधानसभा (Vidhansabha) निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबतची बैठक देवगिरीवर पार पडली. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गट पहिल्यांदाच राज्याबाहेर निवडणूक लढवणार आहे. काल रात्री मुंबईत अरुणाचल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पवार साहेबांनाच सपोर्ट देण्याची गरज: युगेंद्र पवारांची भावनिक साद

X: @therajkaran मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) सध्या बारामती (Baramati) तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे (Sharad Pawar) आहे, असे वक्तव्य केले आहे. मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. मला […]