ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यानंतर छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ? महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी

नवी दिल्ली – राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सेशन कोर्टानं भुजबळांना क्लीन चिट दिली होती. त्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पुन्हा सुरु […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढा तिकीटाच्या घोषणेनंतर रमेश बारस्करांविरोधात शरद पवारांची मोठी कारवाई!

सोलापूर : महाविकास आघाडीसोबत फिस्कटल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्वत: ची स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वंचितकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार देण्यात सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांनी २० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. दरम्यान वंचितकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाचे रमेश बारस्कर यांना तिकीट देण्यात आलं आहे. बारस्कर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं भवितव्य आज ठरणार, चार वर्षांपूर्वीच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष

नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध की अवैध यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आनंदराव अडसूळ यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टानं राणा यांचं जात प्रमाणपत्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा उमेदवार?, ठाण्याचा तिढा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला?

मुंबई- महायुतीत तीन ते चार जागांवरुन तिढा अद्याप कायम आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुख्यमंत्री एकतनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा समावेश आहे. ठाणे परिसरात ठाणे, कल्याण आणि पालघर या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. त्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, यासाठी भाजपा नेते आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना हा मतदारसंघ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेसला आणखी 1745 कोटींची नोटीस, एकूण करथकबाकी 3,567 कोटींच्या घरात

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा एकदा काँग्रेसला थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता काँग्रेसला तब्बल १७४५ कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. २०१४-१५ ते २०१६-१६ या मूल्यांकन वर्षासाठी ही थकबाकी पाठवण्यात आली असून त्यामुळे काँग्रेसच्या प्राप्तिकराची एकूण करथकबाकी ३,५६७ कोटींच्या घरात गेली आहे. लोकसभा काही दिवसांवर येऊन ठेवलेली असताना काँग्रेसला करथकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘कितीबी येऊ दे समोर, एकटा बास’, सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

मुंबई- साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या मतदारसंघात जाऊन, त्यांच्याप्रमाणे कॉलर उडवून दाखवणाऱ्या शरद पवारांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हाच पवारांचा फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटस म्हणून ठेवला आहे. या स्टेटला ‘कितीबी येऊ द्या समोर, एकटा बास’, हे गाणंही त्यांनी लावलं आहे. कितीही विरोधक समोर आले तरी एकटे शरद पवार सगळ्यांना पुरुन उरतील, असा संदेश या पोस्टमधून अजित पवार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; दिल्लीच्या रामलीला मैदानात विरोधकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून ते तुरुंगात आहे. यावर निषेध व्यक्त करीत विरोधकांनी रविवारी ३१ मार्च रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात शक्तिप्रदर्शन केलं. या जंगी सभेत राहुल गांधीसह सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर मॅचफिक्सिंगचा गंभीर आरोप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर जानकरांचं ठरलं ; परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

मुबंई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar )लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत .अखेर आज त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group)त्यांच्या कोठ्यातून परभणीतून (Parbhani) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती […]

महाराष्ट्र मुंबई

बारामतीतली लढत स्पष्ट, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत निश्चित, इतर जागांचं काय?

मुंबई- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत आज अखेर घोषित झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानं हा संघर्ष येत्या काळात अधिक जोमदार होण्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत नणंद -भावजच्यात काटे कि टक्कर ; सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar)यांचा कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आता शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत सुप्रिया सुळे( Supriya Sule ), शिरुरमधून अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe)आणि अहमदनगरमधून निलेश लंके (Nilesh Dnyandev Lanke)नावाची घोषणा केली आहे .यानंतर लगेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार(Sunetra Pawar )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली […]