ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाकडून 17 तर वंचितकडून 8 उमेदवारांची घोषणा; मविआ कसा ठरवणार जागावाटपाचा फॉर्म्युला?

मुंबई : महायुतीविरोधात कंबर कसलेल्या महाविकास आघाडीची पकड हळूहळू सैल होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे महाविकास आघाडीसोबत ६ जागांवर चर्चा सुरू असताना त्यांनी थेट ८ उमेदवारांची घोषणा करीत एकला चलो नाराच दिला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब शरद पवार गटात होणार सामील, भाजपला मोठा धक्का; यंदा माढा लोकसभेची लढत चुरशीची

माढा : शरद पवार गटाकडून भाजपला जबर झटका देण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का आहे. भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हो नाही म्हणता म्हणता, भाजपकडून नवनीत राणांनाच अमरावतीतून उमेदवारी; आजच होणार पक्षप्रवेश?

अमरावती : पंतप्रधान मोदींच्या फोटोसह प्रचाराचा रथ तयार असूनही गेले अनेक दिवस तो धुळखात पडला होता. अखेर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर राणा दाम्पत्य भांड्यात पडले आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेले बच्चू कडूंकड़ून नवनीत राणांना जोरदार विरोध केला जात होता, त्यामुळे अमरावतीतून नेमकं कोण लढणार, याबाबत संभ्रम होता. मात्र आज भाजपची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमोल कीर्तिकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम : समन्स बजावल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचे नाव जाहीर केले आहे.मात्र त्यांचे नाव जाहीर करताच त्यांना ईडीने समन्स जरी केले आहे .यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut )यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , अमोल कीर्तिकर हेच उमेदवार राहतील, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण हा तुमचा पिंड नाही ; अजितदादांचा अमोल कोल्हेना टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या आरोप प्रत्यारोपदरम्यान अजितदादांनी पुन्हा एकदा राजकारण हा आपला पिंड नाही ,ते आपले काम नाही, असे सांगणारे आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात राजकीय खेळी ; शरद पवार गटाचे खासदार मोहिते पाटलांच्या भेटीला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली आहे . त्यांच्या या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. त्यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला होता. आपण दावा केल्यानंतरही भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूनंतर भाजप नेत्यांचाही विरोध

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) याना भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे . मात्र त्यांच्या या उमेदवारीला महायुतीत असणारा प्रहार पक्ष विरोधात आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. त्यांच्यानंतर आता भाजपही मैदानात उतरल्याची माहिती समोर आली आहे . विशेष म्हणजे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करायला नको होते ; निरुपमानांतर वर्षा गायकवाडाचा सूर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाकडून 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत ( sanjay raut यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर ; मोदींसह गडकरी शिंदे, पवार,आठवलेंचा समावेश

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आता मतदारसंघातील उमेदवाराच्या यादीपाठोपाठ आता भाजपच्या (bjp )स्टार प्रचारकांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) साठी भाजपने ही यादी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi), जे.पी.नड्डा, (J P Nadda), […]