मुंबई : लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचे नाव जाहीर केले आहे.मात्र त्यांचे नाव जाहीर करताच त्यांना ईडीने समन्स जरी केले आहे .यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut )यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , अमोल कीर्तिकर हेच उमेदवार राहतील, त्यांना अजिबात बदलेले जाणार नाहीत. अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले . आम्ही शिवसैनिक घाबरणारे नाही, डरपोक नाही. जे घाबरणारे होते ते आधीच शिवसेनेतून पळून गेल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि गटातील नेते हे भाजपवर टीका करतात आणि दुसरीकडे खिचडी घोटाळा प्रकरणी इडीचं समन्स दिलेल्या नेत्यालाच उमेदावीर जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे गटाने आपली लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण येथून अरविंद सावंत तर मुंबई वायव्य येथून अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर होताच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्यातील आरोपीला आमच्या डोक्यावर थोपविले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. खिचडी चोराला आपण कधीच समर्थन करणार नाही असे सांगत हल्लाबोल चढवला . या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिचडी घोटाळ्यात समन्स बजावलेलया अमोल कीर्तिकरांना पाठींबा दर्शवला आहे .
कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तिकरांना ईडीने समन्स बजावले होते . विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे समन्स देण्यात आले असून पुंन्हा त्यांना सकाळी चौकशीसाठी बोलवले होते . खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांच्यासोबत अमोल कीर्तिकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले होते