नवनीत राणा भाजपात, बच्चू कडू नाराज, प्रहार जनशक्ती लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता
मुंबई- अमरावती लोकसभा मतादरसंघातून अखेर भाजपाच्या उमेदवाराच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा यांना भाजापनं उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर रात्री उशिरा नवनीत राणा यांनी नागपुरात भाजपात प्रवेश केला. रवी राणा यांनी नेहमीच अपक्ष असतानाही भाजपाची साथ केली होती. आता पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर भाजपात प्रवेश करत असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलंय. […]








