मुंबई ताज्या बातम्या

North Mumbai Lok Sabha : उद्धव ठाकरेंची भाजपविरोधात खेळी : उत्तर मुंबईतून कडव्या शिवसैनिकाला उमेदवारी

X: @therajkaran महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघांवर सर्वच पक्षश्रेष्ठींचा डोळा आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदारसंघात मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी 41 जागी महाविकास आघाडीविरोधात उमेदवार देणार!    

X: @therajkaran वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर ते पत्र शेअर केले आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात काँग्रेसला (Congress) सात मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सांगाल त्या सात जागांवर आम्ही काँग्रेस […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

NCP controversy : शरद पवार गटाला कोर्टाचा दिलासा :’राष्ट्रवादी-एससीपी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह निवडणुकीत वापरता येणार

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाला दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी-एससीपी’ हे नाव आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर पण.. आम्ही ती नाकारली : सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

X: @therajkaran आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूरमधून लोकसभा निवडणूक (Solapur Lok Sabha) लढवण्यास इच्छुक आहेत. सोलापूरमधून माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता असून काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असे प्रणिती शिंदे यांनी जाहीर केलं आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा खुलासा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“…..तर ते महाराष्ट्रद्रोही म्हणून ओळखले जातील” : संजय राऊतांचे टिकास्त्र

X: @therajkaran भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी व शहा यांच्या पक्षाला कोणी मदत करणार असतील तर अशा लोकांची ओळख महाराष्ट्रद्रोही अशी राहील,’ असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मला या म्हटले.. म्हणून मी आलो” : बैठकीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

X: @therajkaran महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मनसे लवकरच भाजपसोबत युती करुन महायुतीचा भाग होईल, अशी शक्यता आहे. यासाठीच भाजप नेत्यांनी राज यांना दिल्ली दरबारी बोलावले होते, अशी माहिती आहे. राज ठाकरेंनी या भेटीवर “मला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विचार करा, महाराष्ट्र धर्म जपा! – राज ठाकरेंना रोहित पवारांचं आवाहन

X: @therajkaran मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली भूमिका मांडत महाराष्ट्र धर्मासाठी, सामान्यांसाठी महाशक्तीच्या विरोधात लढणारे नेते आज लोकांना हवे आहेत. राज ठाकरे यांनी अशीच भूमिका घ्यायला हवी. त्यांनी विचार करावा आणि महाराष्ट्रधर्म […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

ठाकरे, शरद पवारांनी असमान वागणूक दिली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, केवळ काँग्रेसला इतक्या जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव

मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

प्रिया दत्तही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? मुंबईच्या या मतदारसंघातून तिकिट मिळणार असल्याची चर्चा

मुंबई- एकीकडे राज ठाकरे दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेलेले असताना, दुसरी एक मोठी राजकीय घडामोड मुंबईत घडताना पाहायला मिळतेय. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता प्रिया दत्तही महायुतीत सामील होतात का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. प्रिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता […]