ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं झालं ते जाहीर करा’ – नाना पटोले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरुन आता नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक सवाल उपस्थित केला आहे. ‘हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीला ‘वंचित’ मारणार दांडी, प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या २७ फेब्रुवारी मंगळवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीला अनुपस्थितीत राहणार असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या जाहीर सभेचं कारण पुढे करीत आंबेडकरांनी उपस्थित राहता येणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र मविआने आपली बैठक उद्याऐवजी परवा ठेवली तर आम्हाला सोईचं होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठीच्या अधिवेशनास आज वंदे मातरम आणि राज्य गीताने प्रारंभ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. दुपारी दोन वाजता २०२४-२५ या वर्षाचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतील‌. आज सभागृहात सादर झालेल्या ८ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

केजरीवालांना सातव्यांदा समन्स, इंडिया ‘आघाडीसोबतची युती तोडणार नाही’; आपचा इशारा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. केजरीवालांना सातव्यांदा ईडीने समन्स पाठवलं होतं. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याची सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. दररोज समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा. आम्ही इंडिया आघाडीसोबतची युती तोडणार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, तळघरात पूजा सुरूच राहणार!

लखनऊ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, मशिदीमध्ये पूजा सुरूच राहणार आहे. यापूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘फसवणूक नको आरक्षण द्या’, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

जालना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पुढील १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छं. संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

मुंबई आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधान परिषद तर दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. अधिवेशन पुढील पाच दिवस चालणार आहे. उद्या २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे आंतरवालीत दाखल, मराठा बांधवांना घरी परतण्याचं आवाहन

जालना रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईला जायला निघाले होते. सलाईनमधून विष देऊन, एन्काऊंटर करुन किंवा उपोषणातून मला संपविण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. आपला बळीच घ्यायचा असेल तर आपणच फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊ आणि तेथे त्यांनी आपला बळी घ्यावा, सरकारने आपल्या बदनामीचं षडयंत्र रचल्याचा आरोप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आमदार गणपत गायकवाडांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?

डोंबिवली : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलेल्या या भाष्यानं राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]