ताज्या बातम्या राष्ट्रीय

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर, अमित शहांविरोधात केलं होतं वक्तव्य

सुल्तानपूर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूरच्या न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आज जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी २५ हजारांचे दोन जातमुचलक भरले. ५ वर्षांपूर्वी कर्नाटकात अमित शहा यांच्यावर केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 2018 च्या कर्नाटक निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, प्रामाणिकपणाबद्दल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उ. महाराष्ट्रात महायुतीत जागांची अदलाबदल, कोण कुठल्या मतदारसंघातून लढणार?

नाशिक आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अनेक मतदारसंघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. यात नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद कशासाठी? मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे मराठा सर्व्हेक्षणाचा अहवाल सुपूर्द केला होता. आजच्या अधिवेशनात त्यावर चर्चा केली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालात यासंबंधित मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. त्याचा घेतलेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचं जागावाटप ठरलं, कुणाला फायदा, कुणाला नुकसान, भाजप नेमक्या किती जागांवर लढणार?

मुंबई लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्यांचं लक्ष असलेल्या महायुतीचं जागावाटप निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागावंर लढणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्कामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत कमी जागा मिळाल्याचं दिसतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठ्यांचं स्वप्न पूर्ण होणार? मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन

मुंबई राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार असल्याने कुणबी एकत्रीकरण समिती आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनावरुन काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत. मागासवर्ग आयोगाने राज्यभरात मराठा समाजाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगडावर स्वराज्य सप्ताहाचा समारोप; प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी रयतेचा राजाला केले अभिवादन

रायगड ‘रयतेचे राज्य कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य असून अनेक आक्रमक परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रायगडच्या या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले याचा रायगडकरांना अभिमान आहे’; अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रयतेचा राजाला अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक १२ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कुणाला नाही म्हणणार नाही’, भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी बावनकुळेंकडून सर्वांसाठी दार खुले

नागपूर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचा दिल्लीत भीषण अपघात

नवी दिल्ली नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नवी दिल्लीत हा प्रकार घडला. सुदैवाने हेमंत गोडसे या अपघातातून बचावले आहेत. शिवजयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरम्यान संसदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे काल दिल्लीला आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते निवासस्थानाच्या दिशेने परतत होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत जाणार का? आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर गेले होते. त्यानंतर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपमध्ये जाण्याचा कमलनाथांचा प्लान रद्द, राहुल गांधींशी चर्चेनंतर निर्णय बदलला; सुपूत्र नकुलनाथांचं काय?

भोपाळ मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मंत्री सज्जर सिंह […]