महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मंत्री आतिशिंच्या अडचणीत वाढ ; दिल्लीच्या भाजपने पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई : कथित मद्य विक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना राऊस जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी (Atishi Marlena) यांनी यावरून भाजपवर ताशेरे ओढत त्यांच्यावर आरोप केले आहेत भाजपमध्ये या नाहीतर एक महिन्यात तुरुंगात जा, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय निरुपम काँग्रेसचा हात सोडणार, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळणार तिकीट

मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक नेते संजय निरुपम उद्या काँग्रेसला रामराम करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उद्या संजय निरुपम काँग्रेसचा राजीनामा देणार असून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निरुपम यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या निरुपम यांनी पक्षाला एका आठवड्याचा कालावधी दिला होता. मात्र त्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंच्या यादीनंतर सांगलीत घमसान ; आर.आर.आबांच्या लेकाची उडी म्हणाले … सांगली काँग्रेसचीच !

मुंबई : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray )पक्षाकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत . यावरून आता सांगलीत जागेवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्या रस्सीखेच सुरु आहे .ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील(Chandrahar Patil ) यांना सांगलीतून (sangli) लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पण यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याण , हातकणंगले , पालघरसह जळगावातही ठाकरेंचें शिलेदार रिंगणात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमदेवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे . दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray )मतदारसंघातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे . एकूण चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, ज्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे मुकाबला रंगणार का?

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानण्यात आली असून आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar)त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांच्यावरच ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेत चौरंगी लढत ; ठाकरेंची मशाल घेऊन सत्यजित पाटील -सरुडकर रिंगणात

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत चर्चेत ठरलेल्या हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर (Satyajit Patil Sarudkar )यांना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)आणि शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उन्मेष पाटलांचा भाजपला धक्का ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन ; मातोश्रीवर जल्लोष

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मेष पाटील (Unmesh Patil )यांनी भाजपला रामराम करत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे . त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार गटाच्या पाच जागांचे उमेदवार आज जाहीर होणार ; माढ्यात अन साताऱ्यात कोणाला उमदेवारी ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“ठाकरेंची शिवसेना पळवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में …… ” : संजय जाधव

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav)यांनी महायुतीविरुद्ध दंड थोपटले आहेत .यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde )यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (Shiv Sena) पळवून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था आता ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ अशी झाली […]