ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेसाठी ठाकरे गट रिंगणात ; अनिल परब यांच्यासह अभ्यंकर यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून आता राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या (vidhan parishad maharashtra election) निवडणुकीचे पडघम वाजणार आहे . राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ( Thackeray group ) आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब( Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा राजकारणाला रामराम !

मुंबई : जळगावच्या राजकारणातील मोठे नेतृत्व असणारे माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain)यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती . मात्र आता त्यांनी राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची धुळे -जळगावात तोफ धडाडणार ! कोणावर साधणार निशाणा ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभांचा धडाका लावला जात आहे. तसेच मतदारसंघातून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे धुळे(Dhule )-जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर येणार आहेत. आज दुपारी 3 वाजता ते मुंबईकडून जळगावकडे रवाना होणार आहेत. दुपारी 3.45 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्बल २५ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार !

मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बच्चू कडूंना मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा पाठींबा ‘; रवी राणांचा आरोप

मुंबई : आगामी लोकसभेसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . या निवडणुकी दरम्यान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादात आता अधिक भर पडली असून बच्चू कडूंना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पाठबळ असल्याचा गंभीर आरोप आमदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

मोदी-शाहांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष, मविआकडूनही हे नेते रिंगणात

मुंबई- महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात मोदी-शाहा ही जोडगोळी जोरदार प्रचार करताना दिसतेय. तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी मविआकडूनही जोरदार प्रतिवार होताना दिसतायेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघंही महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडवताना दिसतायेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात मतदानाचा टक्का घसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक झालेले दिसतायेत. भाजपाच्या प्रचाराची मुख्य धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, कुठे आहे मतदान, काय तयारी?

मुंबई- महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचारासाठी अमित शाहा हे अमरावतीत येत असून, राहुल गांधी हे सोलापूर आणि अमरावतीत प्रचार करणार आहेत. राज्यात कोणत्या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होणार आहे हेही जाणून घेऊयात. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नेमक्या कुणाच्या अटकेचा होता प्लॅन, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? अटकेच्या भीतीनं फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडलं, काय म्हणालेत संजय राऊत?

मुंबई- मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचं षडयंत्र रचलं जात होतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. खोट्या गुन्हात या चारही नेत्यांना अडकवण्याचा कट होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.२०२४ च्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आधी मोदी, शहांवर कारवाई करा’; ‘जय भवानी’ च्या मुद्द्यावरुन ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं!

मुंबई : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाच्या प्रचारगीतावर आक्षेप घेण्यात आला असून यातील ‘हिंदू’ आणि ‘भवानी’ हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचारगीतातील एकही शब्द हटवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेना फुटीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं होते. लोकसभा निवडणुकीसाठी या मशाल चिन्हाभोवती एक प्रचारगीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

फडणवीसांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न, मोदी-शाहांनी फडणवीसांचे पंख छाटलेत, राऊतांचा काय दावा?

मुंबई- उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचे तीव्र पडसाद राजकारणात उमटताना दिसतायेत. भाजपाकडून या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरु असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान होण्याचं मोठं स्वप्न आहे, त्यातूनच त्यांनी हे विधान केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. काय म्हणालेत संजय राऊत? […]