मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . सत्त्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरून , उमेदवारीवरून खटके उडत आहेत .सांगलीत ठाकरे गटाकडून (Thackeray )देण्यात आलेल्या चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) उमेदवारीवर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) वादाची ठिणगी पडली आहे .च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकला आहे . त्यामुळे, महाविकास आघाडीत सांगलीच्या उमेदवारीवरून बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत . यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत( Sanjay Raut )यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे .राऊत हे शरद पवारांचा अजेंडा राबवत आहेत. सांगलीच्या जागेवरून मुद्दाम त्यांनी मुद्दाम ख्वाडा घातलाय. हे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून करताये आम्हाला शिकवू नये. पन्नास खोके आम्हाला काय सांगतो. आम्ही जेव्हा विवस्त्र होऊ तेव्हा तू ये आणि दर्शन घे… संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं आहे असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे .
त्यानंतर आता दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून जास्त आवाज करू नका असा सल्ला राऊतांनी पंतप्रधान याना दिला आहे . तसेच सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. कोणीही पक्षाच्या प्रचार यंत्रणेवर बहिष्काराची भाषा करत असेल, तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, तर याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्त्व काँग्रेसनं करावं असं आम्ही मानतो. देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा असावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? हे त्यांनी सांगावं.”असे राऊतांनी म्हटले आहे .
दरम्यान भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी आहे .यावर बोलताना ते म्हणाले , प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही, त्यावर त्यांचं जे काही मत असेल ते त्यांनी शिंदे साहेबांकडे मांडावं. नाशिकच्या जागेबद्दल वाद असायला नको. गोडसे 2 वेळा खासदार राहिले आहे. त्यांची लीड वाढत गेलीय. आता कोणत्याही जागेवर तिढा असा राहिलेला नाही. भाजप आणि आमच्यात असा कोणता चिंतेचा विषय नाहीये. तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवतील. आज शिवसेनेची यादी जाहीर होणार आहे, जास्तीत जास्त मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील, असंही ते म्हणाले.बऱ्याचश्या ठिकाणाहून जे सर्वे आले ते निगेटिव्ह दाखवण्यात आले. पण तिथले सगळे कार्यकर्ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत . भेट घेऊन तिथे सांगत आहेत की आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे अशा सर्वांना फार काही जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. येत्या काळात महायुतीच जिंकणार, असं शिरसाट म्हणाले.जागावाटपाबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही नावांची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1-2 जागांवर नाराजी होती. तिन्ही नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आग्रह असणं गैर नाही. पण समजूत घालणं, संवाद साधणं गरजेचं असतं. ते या तिन्ही नेत्यांनी केलंय. एखाद्या मतदारसंघात अशी घटना होत असते, असं संजय शिरसाट म्हणाले.