मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतदारसंघातील जागेवरून खटके उडत आहेत . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील (Thane) जागा ठाकरेंची शिवसेनाच जिकणारं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde)चांगलंच डिवचलं आहे . कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात येतील असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावरून आता ठाण्यात चांगलीच वादाची ठिणगी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
राऊत म्हणाले , ठाणे, कल्याण, डोंबिवली ,पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आहेत. तो गट फुटलेला आहे ठाणे -कल्याण ही जागा शिवसेना कडेच आहे आणि राहणार . तेथे राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत .दुसरा गट भाजपा बरोबर व्यवहार करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले भाजपासोबत दोन्ही धूनी भांडी करत आहेत .त्यांना हा प्रश्न विचारावा, त्यांना विचारते कोण? काही दिवसांनी ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच. काहीतरी परिवर्तन होईल, तेव्हा वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील हे वेटिंग वरती दिसतील,असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे .तसेच पालघर आणि कल्याण उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar ) राऊतांनी पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न केला.आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे. संविधान वाचविण्याची जबाबदारी देशाच्या प्रत्येक नागरिकाची आहे.आंबेडकर यांना आम्ही वारंवार आवाहन केलेल आहे आणि चर्चा देखील केली आहे असे देखील राऊतांनी स्पष्ट केले आहे . .
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्हीच ठाण्यातून जिकणार असा विश्वास व्यक्त करत आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर राहणार नाही.आम्हाला खात्री आहे . ते आंबेडकर आहेत.असे ते म्हणाले . वेळोवेळी मीटिंगमध्ये आंबेडकर यांना बोलवलं आहे. सर्वांनी नोटीस केलेले आहे. कालच्या मीटिंगमध्ये ते नव्हते .त्यांना एक प्रस्ताव दिलाय. त्या प्रस्तावामध्ये ५ जागा ऑफर केल्या आहेत असेही राऊतांनी स्पष्ट केले . दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३ एप्रिलला महाविकास आघाडीची मुंबईत शिवालयात पत्रकार परिषद होत आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi )प्रमुख नेते घटक पक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तर 31 तारखेला रामलीला मैदानावरती जी रॅली आहे. त्या महा रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.