मुंबई ; सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच पेटलं आहे . अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत . त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातही सहभाग घेतला आहे . दुसरीकडे या मतदारसंघातून लढण्यास काँग्रेसही ठाम आहे . यावरून आता काँग्रेसचे विश्वजित कदम (Vishwajeet Patangrao Kadam )यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे .ते म्हणाले , सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य कुणी करु नयेत .तसेच सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहित असणाऱ्या कुठलाही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं तरी तो सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे .असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे .
काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याच मतदारसंघात आम्हाला कोणी इशारा देऊ नये, इशारा देण्याची आवश्यकता नाही. आजच्या बैठकीला विशाल पाटील माझ्यासोबत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहेत. हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितले आहे. मी राज्यात काम करत असलो तरी, आजच्या घडीला फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी काम करतोय . तिन्ही पक्ष काँग्रेस -राष्ट्रवादी – शिवसेना निवडणुकीला सामोरे जात असताना तिन्ही पक्षाना एकमेकांची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला कमी लेखले पाहिजे. सांगलीत काँग्रेसच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
दरम्यान दुसरीकडे सांगलीच्या जागेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अस्तित्व आहे. त्यामुळे ही जागा सोडायला नको, अशी भूमिका विशाल पाटील यांनी वरिष्ठांकडे मांडली आहे., मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे . त्यामुळेसांगली आमचीच असा ठाम विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे .