महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india declare statistic) गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या पाच टप्प्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात (Loksabha Eelction) किती टक्के लोकांनी मतदान केले हे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात 66.14 टक्के मतदान , दुसरी टप्पा – 66.71 टक्के मतदान , तिसरा टप्पा – 65.68 टक्के मतदान , चौथा टप्पा – 69.16 टक्के मतदान , तर पाचवा टप्पा – 62.20 टक्के झाले आहे . . तसेच, आयोगाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून मतदान टक्केवारीत कुठलाही बदल झाला नसल्याचेही सांगितले आहे . .

निवडणूक आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रारंभीची टक्केवारी व अंतिम टक्केवारीमध्ये 5.75 टक्क्यांची तफावत आढळून आली. त्यामुळे, आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते . या टीकेवर आयोगाने उत्तर देत पहिल्या पाच टप्प्यातील झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे . तसेच मतदान टक्केवारीवरुन काही चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्याचंही आयोगाने म्हटले आहे. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे . ते ,म्हणाले या जाहीर केलेल्या टक्केवारीनंतर जनतेचा दबाव लोकशाहीमध्ये काय करू शकतो, हे आज दिसून आले. ज्या टप्प्या – टप्प्यात मतदान झाले. त्या मतांची एकत्रित आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. जनतेमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रोष वाढत चालला होता. जनतेचा आपल्यावरील विश्वास उडू लागलाय, हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने आज दुपारी अचानक हे पाऊल उचलले. जनता एकत्र आली तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडलं. यामध्ये सर्वाधिक लक्ष लागलेल्या दिल्लीतील सात मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. या ठिकाणी आप आणि काँग्रेसने आघाडी केली असून त्यांनी भाजपसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं चित्र आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात