मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं (PM Modi) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे . त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप( bjp) स्वतःकडेच ठेवणार आहेत. फॉर्म्युल्यानुसार चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला (Telugu Desam Party )३ कॅबिनेट मंत्रिपदं, नीतिश कुमार यांच्या जेडीयूला (Janata Dal) २ कॅबिनेट मंत्रिपदं, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एक कॅबिनेट, बिहारच्या हिंदुस्थान आवाम( HINDUSTHAN AWAM ) या पक्षाला १ कॅबिनेट तर महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवेसनेला( Shinde Group) १ कॅबिनेट १ राज्यमंत्री पद, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला (ncp ), अपना दल पक्षासह आरएलडी पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार आहे.
एनडीए आघाडीत महाराष्ट्रातील अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाही समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रालय येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि अवजड उद्योग मंत्रालय यांचे नाते जुने राहिले आहे. आजपर्यंत अनेकदा हे खाते महाराष्ट्रातील मंत्र्याच्या वाट्याला आले आहे. तसेच रामदास आठवले यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.एनडीए आघाडीकडून आजच सरकार स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार गटाचा एकच खासदार जिंकून आला असला तरी प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. आता मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.आजच यासंदर्भात एनडीएच्या खासदारांची होणार बैठक होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत . मागील सरकारमध्ये एनडीएतील घटक पक्षामध्ये पाचपेक्षा कमी मंत्रिपद होते . मात्र या सरकारमध्ये भाजपला एनडीएतील घटक पक्षालाही महत्व द्यावं लागणार आहे . या नव्या सरकारमध्ये घटक पक्षाचे १६ ते १८ मंत्री असण्याची शक्यता आहे .
.