मुंबई ; गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघात (Kalyan Lok Sabha ) लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde )यांना उमेदवारी जाहीर केली आहे . तर ठाकरेंकडून या मतदारसंघात वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे . त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली माने यांच्यात लढत रंगणार आहे . त्यामुळे या लढतीकडे मुंबईसह राज्याचं लक्ष लागल आहे .
कल्याण मतदारसंघातील श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक भाजप नेत्यांकडूनही जोरदार विरोध होता. त्यांना उमदेवारी दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही, असा ठरावच भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या (ganpat gaikwad) कार्यालयात मंजूर झाला. पण आता श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. युती धर्म पाळून कट्टर विरोधक श्रीकांत शिंदेंसाठी गणपत गायकवाड काम करणार का? की वेगळी भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का? हे पाहणे आत महत्वाचे ठरणार आहे . या उमेदवारीवर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबरीपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी त्यांना कल्याणमधून आम्ही सगळे- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप- आमची जी बृहद युती आहे, त्यांना निवडून आणणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . .
दरम्यान श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उमेदवार आहेत.त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मरण याकडे राजकीय वर्तुळाचे लागले आहे .