मुंबई : लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा (Mumbai North West Lok Sabha ) मतदारसंघामध्ये अद्याप उमेदवारांची प्रतीक्षा असल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रम दिसत होता .. दरम्यान महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढवणार आहे .या पार्श्वभुमीवर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याची चर्चा आहे . या चर्चेत काँग्रेस उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पक्षातून कुणालाच उमेदवारी देणार नाही. ठाकरे गटातून (uddhav thackeray Group) उमेदवार आयात करून काँग्रेस (Congress) जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या महिला नेत्याला ही उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये तेजस्विनी घोसाळकर (Tejaswini Ghosalkar) यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे . येत्या एक दोन दिवसात याबाबतचा निर्णय होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांशी चर्चा करूनच ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या मतदारसंघातून घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार होत्या. त्यांचा यां मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तेजस्विनी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)यांच्या पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्विनी या नगरसेविका होत्या. त्यांनी नगरसेविका म्हणून मतदारसंघात चांगली कामे केली होती. नागरिकांच्या समस्यांची जाण असलेल्या नेत्या म्हणून त्या लोकप्रिय आहेत. दरम्यान या मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्याला उमेदवारी देऊन निवडणूक लढवू तसेच या मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत .
दरम्यान मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघात जवळपास ४.७५ लाख मुस्लिम मतदार आहेत. मुंबईत इतर मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील मतांच विभाजन वेगळी ठरतात. एकीकडे बॉलिवुड कलाकारांची आणि दुसरीकडे उच्च्रभू लोकवस्ती आहे. त्याचबरोबर बेहरामपाडा, कुर्ला यांसारख्या झोपडपट्टीचा पट्टा त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरतो. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी उत्तर मुंबईची जागा मिळाण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र आता याठिकाणी काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत असली तरी अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र लवकरच ही जागा काँग्रेस ठाकरेंचा उमदेवार हाताशी धरून लढणार असलयाने राजकीय समीकरण बदलणार आहेत .