महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्यामागे भक्कमपणे उभे रहा, प्रामाणिकपणे काम करा, विश्वासघात करू नका आणि त्याला निवडून आणा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केले.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर या चार लोकसभा मतदारसंघासह या विभागातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा (review meeting of LS and Assembly seats in North Maharashtra) आज उद्धव ठाकरे यांनी घेतला. या बैठकीला आजी-माजी आमदार, खासदारांसह जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आदी नेते मंडळी उपस्थित होते.

या लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले आज आपल्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, तरीही ‘इंडिया’ (INDIA) या भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये आज आपल्याला सन्मानाने बोलवले जाते, मान दिला जातो, कारण आपण प्रामाणिक आहोत. आपण एकटे लढतो आहोत. आपल्याप्रमाणेच काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) देखील एकट्याने लढत आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा उल्लेखही न करता उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक पक्ष सोडून गेले, त्याची चिंता करू नका. जे आता आपल्यासोबत आहेत, जे या संकट काळामध्ये आपल्यासोबत आले आहेत, त्यांची काळजी घ्या, त्यांना सांभाळा, त्यांना बळ द्या. 

काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरे भरभरून बोलले. ते म्हणाले, काँग्रेसचे राज्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी या संकटकाळातही माझ्यावर विश्वास ठेवला. काँग्रेसच्या दिल्लीच्या नेत्यांचाही माझ्यावर विश्वास आहे, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीदेखील आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला सोबत घेतले. काँग्रेस आपल्याशी प्रामाणिक आहे आणि आपण देखील त्यांच्याशी प्रामाणिक राहायचे आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी आघाडी असेल, असे संकेत देतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला एखादी जागा हवी असेल तर तुम्ही आणि आपला पक्ष त्या ठिकाणी कसा प्रबळ आहे, हे तुम्हाला काँग्रेसला पटवून द्यावे लागेल, तेव्हाच आपल्याला काँग्रेसकडून ती जागा मागून घेत येईल. अन्यथा आघाडीतील ज्या पक्षाला ती जागा मिळेल, त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपल्याला भारतीय जनता पक्षासारखा अप्रामाणिकपणा किंवा बंडखोरी करून आपल्याच सहकारी पक्षाचा उमेदवार पाडण्यामध्ये रस नाही, असे करूही नका, असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे यापुढे मराठवाड्यात (Marathwada) दौरा करणार असून हिंगोलीला ते सभा घेणार आहेत. ते म्हणाले, मी तयारी करतो आहे, तुम्हीही तयारी करा. सामान्य जनता, शिवसैनिक आज आपल्यासोबत आहे, ही आपली ताकद आहे. अन्य पक्षातील नेते माझ्याबद्दल काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. जनता आपल्या सोबत आहे हे फार महत्त्वाचे आहे. निवडणुका कधीही लागू शकतील असे गृहीत धरून आत्तापासून कामाला लागा. मतदारसंघात काम करा, पक्ष वाढवा, जिथे शाखा नसेल तिथे शाखा सुरू करा, ज्या विद्यमान शाखा आहे, त्या शाखांचे बळकटीकरण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

या संपूर्ण मार्गदर्शनात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एकदाही नामोल्लेख केला नाही.

पुढील तीन दिवसात होणाऱ्या आढावा बैठक याप्रमाणे

17 ऑगस्ट

दुपारी 12.30 वाजता : नगर लोकसभा मतदारसंघ

दुपारी 4.30 वाजता : नाशिक लोकसभा मतदारसंघ

सायंकाळी 5.30 वाजता : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

18 ऑगस्ट

दुपारी 12.30 वाजता : मावळ लोकसभा मतदारसंघ

दुपारी 1.30 वाजता : शिरूर लोकसभा मतदारसंघ

दुपारी 4.30 वाजता : बारामती लोकसभा मतदारसंघ

सायंकाळी 5.30 वाजता : पुणे लोकसभा मतदारसंघ

19 ऑगस्ट

दुपारी 12.30 वाजता : सातारा लोकसभा मतदारसंघ

दुपारी 1.30 वाजता : सांगली लोकसभा मतदारसंघ.

दुपारी 4.30 वाजता : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

सायंकाळी 5.30 वाजता : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात