मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) संत तुकारामांच्या (Saint Tukaram) अभंगानं सादर केला . या अर्थसंकल्पात त्यांनी बळीराज्यासाठी विविध घोषणा केल्या . गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्रस्त असणाऱ्या बळिराजासाठी प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक असणाऱ्या या शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे”, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात अखंडित वीज पुरवठा होणार आहे .दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येणार आहे . त्यामुळे आता बळीराजाला शेतीला पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागणार नाही. आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी या योजनेवर विशेष भर दिला.
तसेच महिलांच्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष घोषणा करण्यात आली .मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. “महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या” असं अजित पवार म्हणाले.तसेच महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली .
तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. आषाढी वारीतील (Ashadhi Wari) दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. “विविध शैक्षणिक संस्थातून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळू शकतो. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरु करण्यात येणार आहे” अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली .
- संजय गांधी निराधार योजनेला १ हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळणार
- शेती कृषीपंपाचे सर्व थकित बील माफ होणार
- राज्यात जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार-
- राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
- नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबिवली जाईल
- वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलिंडर मोफत दिले जातील
- बच्चत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल
- यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
- व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार. - येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील
- सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे
- 3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे
- शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे
- मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.
- अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे.