X: @therajkaran
मुंबई: लोकसभेच्या (Lok Sabha election) लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागावाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी, मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bawankule) आम्ही एकत्र बसू आणि पुढील दोन दिवसांत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय जाहीर करू”, असे वक्तव्य भंडारा आणि गोंदिया येथील आयोजित मेळाव्यानंतर केला आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून नियोजन केले जात आहे. राजकीय पक्षही निवडणूक तारखांच्या घोषणांची वाट पाहत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे करत आहेत. हे दौरे 12 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर 13 मार्चनंतर कधीही लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.आम्ही राष्ट्रवादीत आहोत. आमचं पक्ष चिन्ह घड्याळ आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल, तितके उमेदवार लढवू. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा युतीला मिळतील असा आमचा प्रयत्न आहे”, असेही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना इशारा दिला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मला शरद पवार आणि सुनील शेळकेंबाबत काही माहिती नाही. सुनील शेळके विधानसभेतील आमदार असून त्यांच्याकडून माहिती घेईन असे त्यांनी सांगितले.