ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी किती जागा एनडीए आणि इंडिया आघाडीला ? महाराष्ट्रात पाच पैकी कुणाला किती?

नवी दिल्ली- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. विदर्भात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असल्यानं मतदानाचा जोर सकाळच्या सत्रात कमी असल्याचं पाहायला मिळालंय. हाच ट्रेंड दिवसभर राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान देशात 102 जागांसाठी आज मतदान होत असून, या जागांच्या निकालांवर पुढची दिशा स्पष्ट होईल, असं मानण्यात येतंय. 2019 साली या 102 जागांपैकी 40 जागा भाजपानं, 24 जागा डीएमकेनं तर 15 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या इतरांना 23 जागा मिळाल्या होत्या.

यावेळी या 102 जागांवर काय होणार?

दिव्य मराठी वेबसाईटच्या एका वृत्तानुसार, पहिल्या टप्प्य़ात 102 जागांपैकी 40 ते 45 जागा या एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 42 ते 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील जागांत इंडिया आघाडीची सरशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

  1. तामिळनाडू- एकूण जागा-39
    मतदान – 39 जागांवर
    संभाव्य निकाल
    डीएमके-काँग्रेस- 32 ते 37 जागा
    एआयडीएमके आघाडी- 0 ते 3 जागा
    भाजपा – 0 ते 2 जागा
  2. राजस्थान- एकूण जागा-25
    पहिल्या टप्प्यात मतदान – 12
    संभाव्य निकाल
    भाजपा – 05
    काँग्रेस- 01
    इतर -01
    चुरशीची स्पर्धा-05
  3. उत्त्रर प्रदेश– एकूण जागा-80
    पहिल्या टप्प्यात मतदान – 08
    संभाव्य निकाल
    भाजपा – 04
    काँग्रेस आघाडी- 04
  4. मध्य प्रदेश– एकूण जागा-29
    पहिल्या टप्प्यात मतदान – 06
    संभाव्य निकाल
    भाजपा – 04
    काँग्रेस- 02
  5. महाराष्ट्र– एकूण जागा-48
    पहिल्या टप्प्यात मतदान – 05
    संभाव्य निकाल
    भाजपा – 04
    काँग्रेस- 01
  6. उत्तराखंड-एकूण जागा 05
    पहिल्या टप्प्यात मतदान – 05
    संभाव्य निकाल
    भाजपा – 05
    काँग्रेस- 00
  7. बिहार – एकूण जागा 40
    पहिल्या टप्प्यात मतदान – 04
    संभाव्य निकाल
    भाजपा आघाडी- 04
    काँग्रेस- 00

8.प. बंगाल- एकूण जागा-42
पहिल्या टप्प्यात मतदान – 03
संभाव्य निकाल
भाजपा आघाडी- 03
तृणमूल काँग्रेस- 00

  1. ईशान्य भारत -एकूण जागा- 25
    पहिल्या टप्प्यात मतदान – 15
    संभाव्य निकाल
    भाजपा आघाडी – 11
    काँग्रेस आघाडी- 02
    इतर -02
  2. जम्मू आणि काश्मीर -एकूण जागा-05
    पहिल्या टप्प्यात मतदान – 01
    संभाव्य निकाल
    भाजपा – 01
    काँग्रेस- 00

हेही वाचाःसांगली द्या, उत्तर मुंबई मतदारसंघ घ्या, काँग्रेसची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडं लक्ष

Rajkaran Bureau

About Author

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे