ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘५ टक्के अर्थकारणाला लगाम’; मुंबई महापालिकेतील ₹1,550 कोटींची बचत केल्याचा अमित साटम यांचा दावा

BJP MLA Amit Satam addresses the Maharashtra Legislative Assembly during a discussion on reforms, transparency and governance in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC).

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आणण्यात आली असून, कथित ‘पाच टक्के अर्थकारण’ संपुष्टात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव रोखून सुमारे ₹1,550 कोटींची बचत करण्यात आली, असा दावा भाजप आमदार अमित साटम यांनी बुधवारी विधानसभेत केला.

नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना साटम म्हणाले की, पूर्वी महापालिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणाऱ्या वस्तूंपासून विविध कंत्राटांपर्यंत कमिशनचे अर्थकारण चालत होते. मात्र आता मुंबईकरांच्या हिताचा आणि आवश्यक असलेलाच प्रस्ताव मंजूर केला जात आहे.

ते म्हणाले की, महापालिकेच्या शाळांसाठी साहित्य खरेदी तसेच रुग्णालयांतील उपकरणांची खरेदी आता Government e-Marketplace (GeM) पोर्टलवरून केली जात आहे. अनावश्यक रेलिंग, रस्त्यांवरील पांढरा रंग आदी कामांशी संबंधित ₹1,384 कोटींची कंत्राटे रद्द करण्यात आली आहेत.

साटम यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत एक हजारांहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली असून, दररोज निर्माण होणाऱ्या आठ हजार मेट्रिक टन कचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी दोन महिन्यांत नवे धोरण आणले जाईल.

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर देत त्यांनी सांगितले की, सुमारे १,९०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. पाणी तुंबण्याची समस्या कमी करण्यासाठी स्वतंत्र आराखडाही तयार करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात २७ भूमिगत पार्किंग प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सध्या सुमारे ५० लाख वाहने असून दररोज ७२८ नवीन वाहनांची भर पडत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

जन्म-मृत्यू नोंदीतील अनियमिततेवर भाष्य करताना साटम म्हणाले की, ८७ प्रकरणांत फेरफार आणि सुमारे १८ हजार नोंदींमध्ये अनियमितता आढळली असून जवळपास १९ हजार नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

महापालिका रुग्णालयांतील बेड उपलब्धतेसाठी ऑनलाइन डॅशबोर्ड, नागरिकांच्या सहभागातून विकासकामांसाठी ‘Participate Mumbai’ पोर्टल, तसेच मोकळ्या जागांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए अंतर्गत १५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवून स्लम क्लस्टर धोरण लागू करण्याची गरज असल्याचेही अमित साटम यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात