मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात अजून उमदेवार ठरलेला नाही . यावरूनही बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा धरला आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही, आम्ही तुमचा पराभव करू, असे आव्हान त्यांनी महायुतीला दिले आहे.आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल चढवला आहे . .
कल्याण डोंबिवली मध्ये आपण विद्यमान खासदार आहात. आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चमजी. दिल्ली अभी दूर है, आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाहीत. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागातील उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही, नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे ,कल्याण -डोंबिवली मध्ये उमेदवार देऊ शकले नाहीत . स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या, असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे . तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis)जोरदार टीका केली आहे . तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही, नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024 च्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला आहे .
श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीवर बोलताना ते म्हणाले , महाराष्ट्रात अनेक मोठ मोठे लोक पडले आहेत, अजून हा बच्चा आहे स्वतःची उमेदवारी आधी जाहीर करा हिम्मत असेल तर महाराष्ट्रात सर्व उमेदवाऱ्या जाहीर झाल्या फक्त तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे, असा हल्लाबोल त्यांनी चढवला .