महाराष्ट्र ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” — भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई — काँग्रेस पक्षाला भारत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या सर्व शंका व मुद्द्यांवर सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले होते. मात्र, या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्याने आयोगाने खेद व्यक्त केला आहे. “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा त्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखोंचा जल्लोष; रायगडावर गर्दीचा विक्रम

६ जूनचा सोहळा ठरला वैचारिक क्रांतीचा प्रेरणास्थान – संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगड: ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक गर्दीत पार पडला. शिवभक्तांनी प्रचंड उत्साहाने सहभागी होत मागील सर्व विक्रम मोडीत काढले. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर पुन्हा एकदा शिवकाल अवतरल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

….तर वडिलांच्या नावावर काही जण फुशारक्या मारतात!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना घणाघाती टोला मुंबई: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. गुरुवारी रात्री सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडवला. या प्रवेशानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १६ जून २०२५ रोजी, मोफत शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात येणार आहे. बालवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. वाटप करण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे इ. वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

३००० कोटींच्या निविदा गैरव्यवहारप्रकरणी कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: ठाणे-घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्गाच्या निविदेत ३००० कोटी रुपयांची संशयास्पद तफावत उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराचा महामार्ग; १५ हजार कोटींच्या गडबडीची श्वेतपत्रिका काढा – हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

५५ हजार कोटींचा प्रकल्प ७० हजार कोटींवर कसा पोहोचला? काँग्रेसचा सवाल मुंबई : समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारवर काँग्रेसने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींवर गेला, म्हणजेच १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला. यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून सरकारने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“एक राज्य – एक दस्त” धोरण घातक; धोरण रद्द करण्याची आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी

मुंबई – राज्य शासनाच्या प्रस्तावित “एक राज्य – एक दस्त” धोरणामुळे मध्यमवर्गीय व शेतकरी वर्गावर अन्याय होणार असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदाभाऊ खोत यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवाजीनगर बस स्थानकाचे पुनर्बांधकाम हवेतच!

पीपीपी मॉडेलमुळे रखडले प्रकल्प; व्यापारी हितसंबंधांचा आप चा आरोप पुणे – मेट्रो स्टेशनसाठी पाडण्यात आलेले शिवाजीनगर एसटी बस स्थानक अद्यापही मूळ जागेवर उभे राहू शकलेले नाही. तब्बल पाच वर्षे तात्पुरत्या ठिकाणी (जुना पुणे-मुंबई महामार्ग) सुरु असलेले हे बस स्थानक कायमस्वरूपी परत मूळ जागी हलवले गेलेले नाही. या रखडलेल्या प्रकल्पामागे काही व्यापारी हितसंबंध कार्यरत असल्याचा आरोप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदी सक्तीचा लेखी आदेश न निघाल्यास मनसे स्टाइल आंदोलनाचा इशारा

राज ठाकरे यांची सिंहगर्जना – “सरकारने स्पष्ट आदेश काढा, नाहीतर रस्त्यावर येऊ” मुंबई: राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सरकारच्या वतीने जाहीर केल्यानंतरही अद्याप कोणताही स्पष्ट लेखी आदेश निघालेला नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. बुधवारी त्यांनी थेट सरकारला इशारा दिला की, “तत्काळ लेखी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आपत्तीग्रस्तांच्या घरदुरुस्तीसाठी ४९ कोटींचा निधी मंजूर

मंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वाटपाचे आदेश मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या घरांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने ४९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीचे तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत वाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी बुधवारी दिली. “राज्य सरकारच्या या निर्णयामुळे […]