महाराष्ट्र ताज्या बातम्या

उबाठाकडून मुंबईकरांशी 1 लाख कोटींची बेईमानी : आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी मुंबई : गेल्या 20 वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे 1 लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे. ही 1 लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा आरोप मुंबई […]

ताज्या बातम्या मुंबई

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर ‘जगन्नाथ (नाना) शंकर शेठ स्टेशन’ करण्याची मागणी

मुंबई : मुंबईच्या विकासात आणि सामाजिक सुधारणांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या नावाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी समस्त मुंबईकरांच्या वतीने करण्यात आली आहे. नाना शंकर शेठ हे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मार्क्सवादी नेते कॉ. लहानू कोम यांचे निधन; गुरुवारी तलासरी येथे अंत्यसंस्कार

मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज, २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीतील एक झुंजार, संघर्षशील आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व हरपले आहे. कॉम्रेड लहानू कोम १९५९ पासून माकपशी कार्यरत होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून शेकडो कामगार भाजपात

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्यांचा मोठा पक्षप्रवेश; रविंद्र चव्हाण नवे अध्यक्ष मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीबद्दल नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे शेकडो सदस्य मंगळवारी भाजपमध्ये सहभागी झाले. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. या प्रवेशामागे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पुढाकार होता. याच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – मुख्यमंत्री फडणवीस यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : राज्यात सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्याचे” स्पष्ट आदेश दिले. गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे फळबागा, भातशेती, भाजीपाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जतमधील राष्ट्रवादी-काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपमध्ये सामील; उत्तर महाराष्ट्रात भाजपची जोरदार मुसंडी

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेसचे एकूण ११ विद्यमान नगरसेवक मंगळवारी भाजपमध्ये सामील झाले. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ६८ जणांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या यादीत महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे, सुभाष शर्मा आणि डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – तातडीने मदत द्या; कर्जमाफीची घोषणा करा – काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेला बाजूला सारून शेतकऱ्यांना तातडीने एकरी ₹२० हजार व हेक्टरी ₹५० हजार मदत द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारकडे केली आहे. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना खरिपासाठी मोफत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

“दहशतवादाविरोधातील भारताच्या ऑपरेशन सिंदूरला माझा पाठींबा” – खासदार श्री. ठाणेदार यांचे प्रतिपादन

मुंबई– अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून त्यांच्या कार्यपद्धतीत रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची छाया दिसते, असा आरोप अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे दोन वेळा निवडून आलेले भारतीय वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी आज येथे केला. मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिका-भारत संबंध’ या विषयावरील वार्तालाप […]

मुंबई ताज्या बातम्या

पावसात बुडालेली मुंबई आणि मेट्रोच्या भुयारी मार्गात शिरलेले पाणी म्हणजे भ्रष्टाचाराचा पुरावा – उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई – अवघ्या एका पावसात मुंबई पुन्हा एकदा जलमय झाली असून, मेट्रोच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण समोर आले आहे, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेवर गेली तीन वर्षे भाजप आणि मिंधे टोळीचा कब्जा आहे. या काळात जनतेच्या पैशांची लूट झाली. त्याचा […]